spot_img

ई-पीक पाहणीची ई-केवायसी अट रद्द करा,शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य करा अन्यथा चक्काजाम आंदोलन,तिवसा तालुका काँग्रेसचा जिल्हाधिकारी यांना अल्टिमेटम

ई-पीक पाहणीची ई-केवायसी अट रद्द करा,शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य करा

●अन्यथा चक्काजाम आंदोलन
●तिवसा तालुका काँग्रेसचा जिल्हाधिकारी यांना अल्टिमेटम

●मिररवृत्त
●अमरावती

महायुती सरकारने सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-2024 मधील हमीभाव अर्थसहाय हेक्टरी 5000 रुपये मदत घोषित केली असून त्यात शेतकऱ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली त्यांचीच नावे आली आहे, परंतु जे शेतकरी शेतात पोहचू शकत नव्हते किंवा ज्यांना ई-पीक पाहणी करता येत नव्हती त्यांची ई-पिक पाहणी महसूल विभागा अंतर्गत करण्यात येईल असे सरकारने म्हटले होते, ही बाब सुद्धा झाली नाही आणि बऱ्याच जणांची पिक पाहणी करून सुद्धा त्यांची नावे त्यात आली नसल्याने गोंधळ उडालेला आहे.महायुतीने लोकसभा निवडणूक होती म्हणून सरसकट ई पीक पाहणी ही अट रद्द करू अशी घोषणा केली होती, ती घोषणा निवडणूक होतात आता फिरवली आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना विविध योजनांचे आमिष दाखवून कागदपत्रांसाठी आणि ई – केवायसी साठी कृषी विभागामार्फत प्रचंड त्रास दिला जात आहे , यामध्ये ज्यांची ही केवायसी झाल्याने किंवा ज्या म्हाताऱ्या शेतकऱ्यांचा थंब येत नाही त्यांना सुद्धा हेलपाटे घ्यावे लागत आहे. ही यादी कृषी विभागाकडून आली असल्याने ज्यांची नावे आली नाहीत त्यांना कृषी सहाय्यक,महसूल विभाग तलाठी यांच्याकडे पाठवीत आहे. आधी शेतकरी हवालदील झाला असूनही पिक केवायसी ची अट रद्द करावी ही मागणी आज करण्यात आली.*

सोबतच सततच्या पावसामुळे शेतातील उभे पीक हे पिवळे पडणे सुरू झाले असून याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी किंवा ज्यांनी पिक विमा काढलेले आहेत त्यांना पीक विम्याचा मोबदला सुद्धा देण्यात यावा या संदर्भात आज निवासी जिल्हाधिकारी श्री अनिलजी भटकर, जिल्हा कृषी अधिकारी श्री राहुलजी सातपुते यांना भेटून सविस्तर अमरावती जिल्ह्यातील व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती विषद करण्यात आली, तथा लेखी निवेदन देऊन याबाबत प्रशासन व शासनाने निर्णय न घेतल्यास आठ दिवसांनी तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर काँग्रेस पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा तीवसा तालुका काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष तथा नगरसेवक वैभव वानखडे, नगराध्यक्ष योगेश क. वानखडे, नगरसेवक अमर पु. वानखडे, माजी प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रद्युम्न पाटील, माजी एनएसयुआय अध्यक्ष वैभव काकडे, तिवसा शहर NSUI अध्यक्ष आकाश मकेश्वर, शहर युवक काँग्रेस महासचिव तुषार लेवटे आधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!