spot_img

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ‘सुदृढ आरोग्य ‘ या विषयावर गटचर्चा.

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात ‘सुदृढ आरोग्य ‘ या विषयावर गटचर्चा.
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी
श्री शिवाजी विज्ञान महाविद्याल अमरावती येथे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी रसायनशास्त्र विभागातर्फे डीबीटी स्टार एक्झिक्यूटिव्ह स्कीम अंतर्गत आरोग्य विषयक माहिती व शारीरिक सुदृढता या विषयावर गटचर्चा करण्यात आली. यामध्ये अडीचशे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सहभागी झाले. रोजच्या आहारात अन्नामधून कुठले’ पोषक घटक’ घ्यावेत याचे महत्त्व पटवून दिले. ‘निरोगी कसे राहता येईल ..’.याबाबत प्रा. सौ. ज्योती मोहोड( ठाकरे) व सौ.शोभना देशमुख (भुईभार)यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आजारांवर घरगुती औषधोचारासाठी ज्ञान देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत मंडलिक सरांनी केले, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाच्या प्रभारी प्राध्यापक डॉ.अंजली बोधडे यांनी करून दिला .महिला सक्षमीकरण या हेतूने महिला उद्योजिका नीलिमा शेंडोकार यांचा सत्कार घेतला. त्यांच्या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बनवलेली नाचणी मिलेटस्, ओट्स चे बिस्किटे विद्यार्थ्यांना देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. व्ही .कोरपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. राखी बनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.चला तर आज प्रतिज्ञा घेऊ या, सुदृढ आरोग्यासाठी प्रयत्नशील राहू या. याच उद्देशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!