spot_img

पोलीस पाटील व ठाणेदाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा मिटविल्या , आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप

पोलीस पाटील व ठाणेदाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञा मिटविल्या

◆आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप
◆दोषींवर अट्रोसीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

◆मिररवृत्त
◆अमरावती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा घरावर लिहिल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत कोणतीही तक्रार नसतांना नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि वाई येथील पोलीस पाटील यांनी घरावरील २२ प्रतिज्ञा मिटविल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र असंतोष उफाळला आहे. याबाबत ऑल इंडिया पँथर सेना, आझाद समाज पार्टी, भीम आर्मी तसेच शेकडो आंबेडकरी अनुयायांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून जातीयद्वेषातून करण्यात आलेल्या या प्रकाराला कारणीभूत असलेले ठाणेदार, पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांच्यावर अट्रोसीटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली जेव्हा अनुयायांना दीक्षा दिली तेव्हा त्यांनी समाजबांधवांना २२ प्रतिज्ञा दिल्या आणि या प्रतिज्ञा देशभरातील सर्व बौद्ध विहारात तसेच अनुयायी यांनी आपल्या घरी लिहून ठेवल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाई (बोथ) याठिकाणी बौद्ध वस्तीमधील अरविंद हरिदास रंगारी यांनी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा लिहून ठेवल्या होत्या मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच स्थानिक पोलीस पाटील यांनी या प्रतिज्ञा आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या असल्याची तक्रार ठाणेदार सुनील सोळंके यांना केली आणि १४ एप्रिल रोजी ठाणेदार सुनील सोळंके, इतर पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटील यांनी संगनमत करून कोणतीही पूर्वसूचना न देता काळ्या ऑइलपेंट ने २२ प्रतिज्ञा मिटविल्या.
२२ प्रतिज्ञा या आमच्या धार्मिक रिवाजाचा एक भाग असून तो आमचा अधिकार देखील आहे.त्यामुळे२२ प्रतिज्ञा आणि आचारसंहिता यांचा दुरदूरपर्यंत संबंध नसून केवळ जातीय देशातून व दोन धर्मात वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणेदार सोळंके व पोलीस पाटील यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप अरविंद रंगारी यांनी केला असून या प्रकारामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचे गांभीर्य बघून आज ऑल इंडिया पँथर सेना, आझाद समाज पार्टी, भीम आर्मी यांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले असून तात्काळ दोषींवर कार्यवाही करून अट्रोसीटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी निवेदन सादर करतांना आझाद समाज पार्टीचे मनीष साठे, अरविंद रंगारी,अमोल शिंदे,सुमित रंगारी,प्रकाश वाडेकर,आकाश कढाने, मारुती नन्नावरे, सुभाष गोंडाने, तेजस रंगारी, साधना चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, अजय मेश्राम, उमेश डवरे, माला रंगारी,कमलाबाई रंगारी, निरूभाई नन्नवरे, शीला गोसावी, शिला रंगारी,उषा गवई ,कुंदा दुधे, नीलिमा राऊत ,बेबी राऊत ,राजू भडके, कुंदन मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम,तेजस मेश्राम ,अंबादास खोब्रागडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!