spot_img

नांदगाव पेठ येथील जि.प.हायस्कुल तालुक्यातून प्रथम , मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान ३ लाखांचे रोख बक्षीस

नांदगाव पेठ येथील जि.प.हायस्कुल तालुक्यातून प्रथम

◆मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान
◆३ लाखांचे रोख बक्षीस

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शालेय शिक्षण योजने अंतर्गत संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, या अभियानात नांदगाव पेठ येथील जिल्हा परिषद हायस्कुलने अमरावती तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.तालुक्यातील प्रथम विजेत्या हायस्कुल ला तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस सुद्धा मिळणार आहे.प्राचार्य देवेंद्र ठाकरे यांच्या अथक परिश्रमाने हायस्कुलने पुन्हा एकदा नावलौकिक मिळविला आहे हे विशेष!
शासनाच्या शिक्षण विभागाच्या निकषाप्रमाणे सहभागी शाळा, हायस्कुलला ३० मुद्द्यांवर कार्य करावे लागले. त्यामध्ये प्रत्येक शाळेचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. या १०० गुणांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग. शैक्षणिक गुणवत्ता,व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम. शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेवर प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधाबाबत खासगी संस्था, व्यक्ती, कंपनी यांचा सहभाग, तंबाखू मुक्त, प्लॅस्टिक मुक्त, पर्यावरण व इतर मुद्द्यांवर शाळांचे मूल्यांकन करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद हायस्कुल ने गुणानुक्रमांक घेऊन अमरावती तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
प्राचार्य देवेंद्र ठाकरे यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येते शिवाय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा बहुमान सुद्धा या शाळेने दिला आहे. जि.प. हायस्कुल ने मिळविलेल्या या यशाबद्दल
गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे,प्राचार्य देवेंद्र ठाकरे,सरपंच कविता डांगे,ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण जामोदकर,पत्रकार मंगेश तायडे यांचेसह पालक व गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

◆शिक्षक व विद्यार्थ्यांचे श्रेय◆

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात आमचे हायस्कुल सहभागी झाले होते.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या परिश्रमाने शाळेने अमरावती तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला ही अभिमानाची बाब आहे आणि याचे श्रेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जाते.

देवेंद्र ठाकरे
प्राचार्य, जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महा.नांदगाव पेठ

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!