spot_img

उद्या वडगाव माहोरे येथे आमदार चषक क्रिकेट सामने , आ. रवी राणा यांच्या हस्ते उदघाटन

उद्या वडगाव माहोरे येथे आमदार चषक क्रिकेट सामने

◆आ. रवी राणा यांच्या हस्ते उदघाटन
◆क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

संत काशिनाथ महाराज क्रीडा मंडळ यांच्या वतीने आज (दि.२) मार्च रोजी वडगाव माहोरे येथे आमदार चषक प्लास्टिक बॉलच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.आ. रवी राणा यांच्या हस्ते महात्मा फुले स्टेडियम, नवीन वस्ती, वडगांव (माहोरे) येथे सकाळी १० वाजता या क्रिकेट सामन्यांचे उदघाटन होणार असून पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
या क्रिकेटस्पर्धेत प्रथम विजेत्या संघास ग्रापं.सदस्य सुयश श्रीखंडे यांच्या वतीने ३१००० रुपये रोख द्वितीय विजेत्या संघास नंदू गौरकर यांच्या वतीने २१००० रुपये रोख तर विक्की थोरात यांच्या वतीने तृतीय विजेत्या संघास ११००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय मॅन ऑफ दि मॅच साठी बंटी उर्फ विशाल बागल यांचेकडून,मॅन ऑफ दि सिरीज साठी सौरभ माहोरे, उत्कृष्ठ फलंदाज साठी उमेश वानखडे,उत्कृष्ठ गोलंदाजसाठी मंगेश कांबळे
उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण साठी आकाश कांबळे यांचेकडून प्रत्येकी ११११ रुपयांचे रोख बक्षीस देणार येणार आहे.
तरी सर्व क्रिकेट रसिकांनी या क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे श्रीपाद माहोरे, कुलदीप कांबळे, आशिष थोरात, प्रज्वल पाटील, आकाश गोरे, अक्षय सावद, आकाश दांडेकर, शुभम अडणे, अजय कासार,रवि कांबळे, पुनेश सुरजुसे, प्रज्वल कंखर, दिपेश आठवले, करण भोंडे, प्रफुल्ल थोरात, आशिष साखरकर, अक्षय राऊत, आकाश सोनोने, निशांत वानखडे यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!