spot_img

आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराने ठाणे हादरलेः कल्याण पूर्वमधील दुकाणे बंद; दोघांच्या ऑफीसजवळ मोठा बंदोबस्त

आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराने ठाणे हादरलेः

●कल्याण पूर्वमधील दुकाणे बंद; दोघांच्या ऑफीसजवळ मोठा बंदोबस्त

●मिररवृत्त
●ठाणे

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात सहा गोळ्या झाडल्या. रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरचे नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचे वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.

◆दंगल नियंत्रक पथकही तैनात◆

तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचे घर तसेच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यामुळे शिंदे गटातील कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी कल्याण पूर्व परिसरात बंदची हाक दिली आहे. खबरदारी म्हणून माजी नगरसेवक, कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आले आहे. उल्हासनगरच नव्हे तर कल्याणमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे.

◆शिवसेना शाखेबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त◆

महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महेश गायकवाड यांच्या शिवसेना शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!