spot_img

भानखेड खु.शाळा जनरल चॅम्पियन शिल्डची मानकरी,प्राथमिक विभागात कठोरा बु.तर माध्यमिक विभागात नांदुरा बु. शाळेने चॅम्पियन शिल्ड पटकाविले

भानखेड खु.शाळा जनरल चॅम्पियन शिल्डची मानकरी !!

■प्राथमिक विभागात कठोरा बु.तर माध्यमिक विभागात नांदुरा बु. शाळेने चॅम्पियन शिल्ड पटकाविले

■मिररवृत्त
■अमरावती

अमरावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सवात भानखेडा खु. शाळेने जनरल चॅम्पियन शिल्ड पटकाविले. तर प्राथमिक विभागात कठोरा बु.व माध्यमिक विभागात नांदुरा बु.शाळा चॅम्पियन शिल्डच्या मानकरी ठरल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनरल शिल्ड देताच सर्व खेळाडूंनी आनंद उधळत एकच जल्लोष केला.
येथील शासकीय माध्यमिक कन्या शाळेच्या प्रांगणात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे बुधवारी ( ता.२४) आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माध्यमिकचे शिक्षण विस्तार अधिकारी अश्विन मानकर हे होते.प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सोनोने, संदीप बोडखे, अजित पाटील, अनिल डाखोडे, केंद्रप्रमुख स्मृती बाबरेकर, सुरेंद्र मेटे, भास्कर दाभाडे, विलास बाबरे, नंदकुमार झाकर्डे, सुधीर भोळे, प्रशांत मुंद्रे, इकबाल पटेल यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे संचालक यांची होती.
बक्षिस वितरण समारंभात सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी चमू व खेळाडूला शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सेवानिवृत्त शिक्षक राजुभाऊ भाकरे व क्रीडा शिक्षक बाळकृष्ण आंधळे यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दोन दिवसीय महोत्सवात सांघिक व वैयक्तिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंजनगाव बारी, वलगाव, नांदगाव पेठ या बिटमधील विजयी संघातील सुमारे ६०० विद्यार्थी व खेळ शिक्षक सहभागी झाले होते.
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मनोज खोडके, रामेश्वर खंडारे, नरेंद्र जोशी, महावीर वानखडे, इमरान खान, रामेश्वर स्वर्गीय, विजय उमप, माधुरी आमझरे, रोशनी निंभोरकर,दमयंती उमेकर, विजया झाडे, किशोर मालोकार, चंद्रकांत कुरळकर,सुभाष सहारे, ज्ञानेश्वर मोहोड, राजेंद्र दीक्षित यांच्यासह समग्र शिक्षा अभियान कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.प्रास्ताविक गटसमन्वयक सुरेंद्र मेटे यांनी केले. संचालन वनिता बोरोडे यांनी तर आभार अनिल डाखोडे यांनी मानले.अशी माहिती प्रसिद्धी समितीचे विनायक लकडे यांनी दिली आहे.

●प्राथमिक व माध्यमिक विभागातील विजयी व उपविजयी शाळा●

◆प्राथमिक विभागातून◆

● खो -खो मुले संघामध्ये पिंपळखुटा शाळा विजयी, उपविजयी कठोरा बु. खो -खो मुलीमध्ये ब्राह्मणवाडा गोविंदपूर विजयी, उपविजयी कठोरा बु.
●कबड्डी मुलेमध्ये नांदगाव पेठ विजयी, उपविजयी पिंपळखुटा कबड्डी मुलीमध्ये देवरा विजयी, उपविजयी बोडणा
● लंगडीमध्ये नांदगाव पेठ उर्दू विजयी, उपविजयी बोडणा

◆माध्यमिक विभागातून◆

● खो -खो मुले संघामध्ये पिंपळखुटा शाळा विजयी, उपविजयी रेवसा, खो -खो मुलीमध्ये रेवसा विजयी, उपविजयी भानखेड बु.
●कबड्डी मुलेमध्ये नांदुरा ल. विजयी, उपविजयी भानखेड बु. कबड्डी मुलीमध्ये केकतपूर विजयी, उपविजयी भानखेड बु.
●व्हॉलीबॉल मुलेमध्ये वाघोली विजयी, उपविजयी वलगाव उर्दू, व्हॉलीबॉल मुलीमध्ये मलकापूर विजयी, उपविजयी वाघोळी.
● बॅडमिंटन दुहेरी मुले नांदुरा बु. विजयी, उपविजयी माहुली उर्दू बॅडमिंटन दुहेरी मुलीमध्ये नांदुरा बु. विजयी, उपविजयी मोगरा

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!