spot_img

अमरावतीत कोणी लँड बँकिंग तर केली नाही ना ?

अमरावतीत कोणी लँड बँकिंग तर केली नाही ना ?

●अजितदादांना संशय

●येथील जमिन नागपूरपेक्षा महाग,टॅक्सही अधिक
●मनपा आयुक्तांना भेटीला बोलावले

●मिररवृत्त
●अमरावती

अमरावतीत जमिनीचे दर हे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे येथे घर खरेदी करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे.लँड बँकिंग हे यामागचे मुख्य कारण असू शकते.त्यामुळे अमरावती शहरात कोणी लँड बँकिंग तर केली नाही ना ? हा जाहीर संशय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.अमरावती मनपाने वाढवलेल्या टॅक्स बाबतही नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.त्यामुळे अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी सोमवारी नागपुरात भेटीला यावे,असा सल्लाही अजितदादांनी यावेळी मनपा आयुक्तांना दिला.
शनिवारी अमरावती दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शहरातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली गटार योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी अमरावती शहराचा विस्तार होत असताना अजूनही शहरात भूमिगत गटाराचं काम पूर्ण झालं नसल्याची खंत बोलून दाखवली. शहर व जिल्ह्यातील डिपीआर संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेवून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती यावेळी अजीत पवार यांनी दिली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!