spot_img

शासनाने सिनीयर सिटीजन (वरिष्ठ नागरीक) करीता “शासन आपल्या दारी” ही योजना राबवावी

शासनाने सिनीयर सिटीजन (वरिष्ठ नागरीक) करीता “शासन आपल्या दारी” ही योजना राबवावी

●मिररवृत्त
●अमरावती

वयाची 60 वर्षे पूर्ण आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला किंवा पुरुषांना सिनीयर सिटीजन (वरिष्ठ नागरीक) असे संबोधले जातात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वरीष्ठ नागरीकांसाठी अनेक चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत मात्र या अनेक योजनेचा लाभ वरिष्ठ नागरीक घेऊ शकत नसल्याने त्या कागदोपत्रीच ठरत असल्याचे वरिष्ठ नागरिकांना पहावयास मिळत आहे. सरकार ला जर वरिष्ठ नागरीकांना जाहिर करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळावा व वरिष्ठ नागरिक समाधानी व्हावे असे जर शासनाला खरोखरच वाटत असेल तर, शासनाने वरिष्ठ नागरिकांसाठी “शासन आपल्या दारी” ही योजना वरीष्ठांसाठी राबवून या योजनेचा लाभ प्रत्येक वरीष्ठ नागरीकाला मिळावा अशी अपेक्षा वरीष्ठ नागरीक करीत आहेत.
ज्या वरीष्ठ नागरीकांकडे अपडेट असलेले व जन्म तारखेची नोंद असलेले आधार कार्ड 💳 आहे त्यांचा संपूर्ण तपशील शासनाकडे उपलब्ध आहे तो तपशील काढून शासनाने ही योजना घरोघरी जाऊन राबविली तर या योजनेचा खरा लाभ वरीष्ठांपर्यंत पोहोचेल आणि एकही वरीष्ठ नागरीक या योजने पासून वंचित राहणार नाही. एकंदरीत वरीष्ठ नागरीकांच्या बाबतीत विचार केला तर काही वरीष्ठ नागरीक गरीब आहेत काहींना मुल बाळ नाही, अनेकांची पत्नी स्वर्गवासी झाली आहे तर कुण्या वरीष्ठ महीलेचे पती स्वर्गवासी झालेले आहेत तर काहींना डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही तर अनेक वरीष्ठ नागरिक शारीरीक व्याधी ने ग्रस्त आहेत तर कुणाकडे वाहन नाही अशा अनेक लहान सहान समस्या असल्यामुळे वरीष्ठ नागरीक या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करण्यासाठी कार्यालयात चकरा मारु शकत नाही त्यामुळे अनेक नागरीक या योजने पासून वंचित राहत आहे आणि त्यांना लाभ मिळत नाही ही वास्तविक शोकांतिका आहे. वास्तविक पाहता शासनाने अनेक चांगल्या योजना वरीष्ठ नागरीक म्हणजे 60 वर्षावरील सिनीयर सिटीजन करीता सुरु केल्या आहेत परंतु या योजनांचा खरा लाभ वरीष्ठ नागरीकांपर्यंत पोहोचत नसल्याचे मोठ्या प्रमाणात ऐकीवात आहे त्या करीता शासनाने वरीष्ठ नागरीक (सिनीयर सिटीजन) करीता “शासन आपल्या दारी” ही योजना वरीष्ठांसाठी राबवून जवळपास सर्वच वरीष्ठ नागरीकांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी सर्रास मागणी वरीष्ठ नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे शासन या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देईल अशी अपेक्षा वरीष्ठ नागरिक करीत आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!