spot_img

शाळा-महाविद्यालयांमधील देखावा ठरलेल्या तक्रार पेट्याचे केले पूजन ,पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचे अभिनव आंदोलन

शाळा-महाविद्यालयांमधील देखावा ठरलेल्या तक्रार पेट्याचे केले पूजन

पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचे अभिनव आंदोलन

●मिररवृत्त
●अमरावती

अमरावती शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी लावलेल्या तक्रार पेट्या या केवळ देखावा व शोभेच्या वस्तू ठरल्या असून याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात अभिनव आंदोलन करून केवळ देखावा ठरलेल्या तक्रार पेट्यांची पूजन विद्यार्थिनींच्या उपस्थितीत करण्यात आले .
अमरावती शहरात गेल्या काही वर्षांपूर्वी शाळकरी मुलीं संदर्भात घडलेल्या घटनांची दखल घेत अमरावतीचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस विभागामार्फत शिक्षक व प्राचार्यांच्या सहकार्याने शहरातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या छेडखानी व अन्य घटनांबाबत आई वडील किंवा पोलिसांकडे थेट तक्रार न करू शकणाऱ्या शाळकरी मुलींनी आपली तक्रार त्या तक्रार पेटी टाकावी ,पोलीस विभागामार्फत ठरलेल्या वेळी ती तक्रारपेटी उघडून त्यामधील तक्रारींची शहानिशा करीत संबंधितांवर कारवाई करून भयभीत मुलींना दिलासा मिळावा आणि त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी हा उदात्त हेतू त्या मागील होता .परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून पोलिसांनी त्या तक्रार पेट्यांकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण उद्देशालाच हरताळ फासल गेला आणि
विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये लावलेल्या तक्रार पेट्या केवळ देखावा आणि शुभेच्छा वस्तू ठरल्या असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला आहे.
बुधवारी राजापेठ परिसरात एका महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या हल्ल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये आपली सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे .स्वतःला असुरक्षित समजणाऱ्या विद्यार्थिनींना तक्रारीचे थेट माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी पुन्हा तक्रारपेटीचा उपक्रम सुरू व्हावा आणि पोलीस विभागामार्फत त्या नियमित उघडून त्यामध्ये येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कारवाई होऊन गंभीर घटना घडण्यापूर्वीच त्यावर पायबंद बसावा याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी बुधवारी अभिनव आंदोलन केले. सुनील खराटे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन केवळ देखावा ठरलेल्या तक्रार पेट्यांचे विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पूजन केले. यावेळी विकास शेळके, निलेश सावळे, संदीप इंगोले, यश वानखडे, रिंकू पंचवटे आणि प्रत्येक शाळा कॉलेज मधील विध्यार्थिनी व शिक्षक आदी उपस्थित होते

●अन्यथा तीव्र आंदोलन करणार●

पोलीस प्रशासनाने या तक्रार पेट्या नियमित उघडून त्यामध्ये आलेल्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करीत असुरक्षित समजणाऱ्या विद्यार्थिनींना दिलासा द्यावा आणि त्यांना भयमुक्त वातावरण निर्माण करून द्यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी पोलीस विभागाकडे केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेकडून लवकरच मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!