spot_img

गौण खनिज उत्खनन करतांना आढळल्यास तात्काळ कारवाई करा, तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी यांचे आदेश

गौण खनिज उत्खनन करतांना आढळल्यास तात्काळ कारवाई करा

◆तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी यांचे आदेश

◆मिररवृत्त
◆नांदगाव खंडेश्वर

तालुक्यातील बेंबळा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळेस सर्रास रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने फुबगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदार भुसारी यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती त्याअनुषंगाने निवेदनाची दखल घेत तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी यांनी गौण खनिज उत्खनन करतांना आढळल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश विभागाला दिले आहे.
फुबगाव,धानोरा शिक्रा, शेलु नटवा, येवती, बेलोरा, जावरा, मोळवण, शिवणी रसुलापुर या गावातील रेती घाटावरून अवैधरित्या रेती उपसा करून रेतीची वाहतूक करण्यात येत आहे.बेंबळा नदीच्या पात्रातून सुद्धा अवैधरित्या वाळू उपसा सुरूच असून आतापर्यंत शेकडो टन रेतीचा उपसा करण्यात आला आहे. तहसिल प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी तहसील कार्यालयात केल्या असून यासंदर्भात अजूनपर्यंत दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला होता।
ग्राम फुबगाव येथील रेती उपसा दबावतंत्र की अर्थकारणामुळे सुरू आहे हा संशोधनाचा विषय बनला होता. रेती उपसा व चोरीसंदर्भात अनेक कडक नियम आहेत; परंतु कारवाई होत नाही पर्यावरणाला नुकसान पोहचत आहे.विशेष म्हणजे शिरपुर फाट्या नजिक जावरा नदितील काही भाग एका शेतकर्याने ताब्यात घेऊन रेती तस्करीसाठी याचा वापर केला जात आहे, सदर ठिकाणा वरुन दरवर्षी जवळपास लाखो टन रेती उपसा करण्यात येत आहे.नदीशेजारी असलेली शेती एका तस्कराने विकत घेऊन तेथून मनमर्जीपणे उपसा सुरू केला असून याला तहसील कार्यालयाचे अभय असल्याचे बोलले जात आहे.फुबगाव येथील बेंबळा नदीवर कोल्हापुरी बंधाराचे द्वार उघडून रेतीचोरांकडून पाणी सोडण्यात येते. या कोल्हापुरी बंधाराच्या पाण्यावर अनेक शेतकरी वर्गाची बारामाही पिके पपई, संत्रा, आंबा आहेत. पाणी कमी झाल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते. गावातील पाणीपुरवठ्याची विहीर यांच बंधाऱ्यालगत आहे. त्यामुळे गावात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे वारंवार तलाठी यांना माहिती देऊन सुध्दा हेतुपुरस्पर तलाठी दुर्लक्ष करीत आहे.
नदीघाट बचावाकरिता कुणीच वाली नाही. नियम केवळ कागदोपत्री येथे दिसत आहे. केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार येथे सुरू आहे. गुणवत्ता प्राप्त व कर्तव्यदश अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहेत. फुबगाव येथील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र तहसिलदार भुसारी यांनी दिनांक १/३/२०२४ रोजी विशेष आदेश काढुन अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ग्रामदक्षता समिती कार्यान्वित करण्याचे आदेश काढले आहे याबाबत तहसिलदार यांच्याशी संपर्क केला असता गौण खनिजाचे अवैध उत्खनन अथवा वाहतुक करतांना आढळुन आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नांदगाव खंडेश्वर तहसिल प्रशासनातील सर्व मंडळ अधिकारी तलाठी यांना दिले आहे.या आदेशामुळे मात्र रेतीतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!