spot_img

समता पर्व अभ्यासिकेला पुस्तके व साहित्य भेट, विद्यार्थ्यांनी मानले बंटी रामटेके यांचे आभार

समता पर्व अभ्यासिकेला पुस्तके व साहित्य भेट

◆विद्यार्थ्यांनी मानले बंटी रामटेके यांचे आभार

◆मिररवृत्त
◆अमरावती

दर्यापूर येथे समता पर्व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला प्रहारचे अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्ची,टेबल भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसह संचालक मंडळाने बंटी रामटेके यांचे आभार व्यक्त केले.
अनेक महिन्यापासून दर्यापूर येथे समता पर्व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू असून त्याठिकाणी दर्यापूर तालुक्यातील अनेक गावचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा सराव करतात.तालुक्यातील विविध गावामधील विद्यार्थी अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावेत व तालुक्याचे नावलौकिक करावे या करीता समता पर्व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सतत प्रयत्नशील असते.गोरगरीब विद्यार्थ्यांना याठिकाणी निःशुल्क सेवा देण्यात येते परंतु येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साहित्य पुस्तके, टेबल, खुर्ची यांची आवश्यकता असल्याचे येथील संचालकांनी बंटी रामटेके यांना सांगितले तेव्हा संचालकांच्या विनंतीला मान देत बंटी रामटेके यांनी रविवारी समता पर्व अभ्यासिकेला जाऊन त्याठिकाणी महागडे स्पर्धा परीक्षा पुस्तके, टेबल,खुर्ची भेट दिली.
समता पर्व अभ्यासिकेच्या बाबतीत जाणून घेऊन संचालक मंडळाचे बंटी रामटेके यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण नक्कीच करू असे आश्वसित केले. यावेळी समता पर्व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाचे संचालक रत्नदीप वानखडे, अतुल धांडे, सचिन धुवे, शुभम विल्हेकर यांनी अमरावती प्रहार महानगरप्रमुख बंटी रामटेके यांचे आभार व्यक्त त्यांनी दिलेली भेट स्वीकारली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!