अमरावती तालुका शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २३ व २४ जानेवारीला
■ गर्ल्स हायस्कूल कॅम्प येथे आयोजन
■ सुमारे ६०० खेळाडू व शिक्षक सहभागी होणार
■मिररवृत्त
■अमरावती
अमरावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे २३ व २४ जानेवारीला शासकीय माध्यमिक कन्या शाळा ( गर्ल्स हायस्कूल) कॅम्प अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सांघिक व वैयक्तिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ६०० खेळाडू व शिक्षक सहभागी होणार असून त्यांची भोजनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
क्रीडा महोत्सवाचे उदघाटन तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बडनेरा मतदार संघाचे आमदार रविभाऊ राणा आहेत. प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी प्रफ्फुल कचवे, गटविकास अधिकारी डॉ. प्रफ्फुल भोरखडे यांच्यासह शिक्षणाधिकारी योजना सैय्यद राजीक सैय्यद गफ्फार, उपशिक्षणाधिकारी श्रीमती प्रिया देशमुख, गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप बोडखे यांची राहणार आहे.
दोन दिवसीय महोत्सवात सांघिक व वैयक्तिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अंजनगाव बारी, वलगाव, नांदगाव पेठ या बिटमधील विजयी संघातील सुमारे ६०० विद्यार्थी व खेळ शिक्षक सहभागी होणार आहे. त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन, स्वागत, निर्णय, मैदान, भोजन, कार्यालयीन, स्टेज, सांस्कृतिक, बक्षिस वितरण व प्रसिद्धी समिती गठीत करण्यात आली असून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बक्षिस वितरण २४ जानेवारीला दुपारी ३ वाजता गटविकास अधिकारी डॉ. प्रफ्फुल भोरखडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर, श्रीमती गजाला नाजली ई. खान, विस्तार अधिकारी अश्विन मानकर, संगीता सोनोने, अजित पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
क्रीडा महोत्सवात सर्व खेळाडू व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी अनिल डाखोळे, केंद्रप्रमुख सुरेंद्र मेटे, स्मृती बाबरेकर, भास्कर दाभाडे, विलास बाबरे, नंदकुमार झाकर्डे, सुधीर भोळे, प्रशांत मुंद्रे, इकबाल पटेल, बाळकृष्ण आंधळे यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष विनायक लकडे यांनी दिली आहे.