spot_img

सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राची स्थापना

सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राची स्थापना
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या श्री मंगलप्रभात लोढा, माननीय मंत्री , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रमोद महाजन कौशल विकास योजनेच्या अंतर्गत राज्यात १००० नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ची स्थापना करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट रहाटगाव अमरावती याही महाविद्यालयाचा समावेश आहे.
या केंद्रांचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे दि. २०/०९/२०२४ रोजी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आले.
सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट या केंद्रावर खालील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे.
१. सिक्युरिटी ॲनालिस्ट या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही क्षेत्रातील पदवीधर किंवा अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी पात्र ठरतील. हा अभ्यासक्रम ४८० तासांचा आयटी क्षेत्रात रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे.
२. सेल्स असोसिएट – डायरेक्ट चैनल या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहे. ४२० तासांच्या या अभ्यासक्रमातून बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस तसेच इन्शुरन्स या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, अमरावती यांच्या निर्देशनानुसार अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची प्रक्रिया महाविद्यालयात लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमाचा अमरावती तसेच अमरावती नजीकच्या गावातील इच्छुक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शिवाय एज्युकेशन सोशल अँड मेडिकल ट्रस्ट या संस्थेचे सचिव प्रा दिनेश सूर्यवंशी यांनी उद्घाटन प्रसंगी केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी कार्यक्रम स्थळी संस्थेच्या अध्यक्ष, डॉ. स्मिता सूर्यवंशी, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. अभय सूर्यवंशी, संचालक एस एस एम आय टी ए डॉ. पल्लवी मांडवगडे, प्राचार्या भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम कॉलेज डॉ अरुणा काकडे, प्रतिनिधी कौशल्य विकास विभाग अमरावती श्री जितेंद्र गायकवाड तसेच मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग आणि प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थी गण उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या तसेच केंद्राचे समन्वयकाची भूमिका प्रा. अमोल करमरकर संचालक, इंडस्ट्री रिलेशन अँड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट यांनी पार पडली.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी व इतर माहितीसाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट, ०९, श्री अंबा बिझनेस पार्क, राहटगाव अमरावती येथे संपर्क साधावा. दूरध्वनी ९८२३१९१५४३, ७७७००१९५४०/४१

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!