spot_img

अयोध्येतील ‘श्रीरामाच्या’ प्रतिकृतीमध्ये साकारले ‘बाप्पा’, बाल दीपक गणेश मंडळाचे दहा दिवस दहा उपक्रम, युवतींच्या संरक्षणासाठी दुर्गा नारी आत्मरक्षा प्रशिक्षण

अयोध्येतील ‘श्रीरामाच्या’ प्रतिकृतीमध्ये साकारले ‘बाप्पा’

●बाल दीपक गणेश मंडळाचे दहा दिवस दहा उपक्रम
●युवतींच्या संरक्षणासाठी दुर्गा नारी आत्मरक्षा प्रशिक्षण

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

अयोध्या येथे स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या प्रतिकृतीसारखी बाप्पाची आकर्षक प्रतिमा येथील बाल दीपक गणेश मंडळाने साकारली.बाप्पांची ही प्रतिमा बघण्यासाठी भक्तांची गर्दी वाढली असून बाल दीपक गणेश मंडळाने या गणेशोत्सवात दहा दिवस दहा विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. सामाजिक कार्यासोबतच युवतींच्या संरक्षणासाठी दुर्गा नारी आत्मरक्षा प्रशिक्षण देण्याचे कार्य सुद्धा या मंडळाच्या वतीने सुरू आहे.
राजपूतपुरा येथील स्व.लालसिंहजी राठोड ले आउट मध्ये यावर्षी बाल दीपक गणेश मंडळाने अयोध्या येथील मंदिराची झाकी साकारली असून मंदिराच्या आतमध्ये श्रीरामाच्या प्रतिकृतीसारखी बाप्पांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतला काम करणाऱ्या सफाई कामगारांकडून मंडळाच्या बाप्पाची स्थापना व पहिली आरती करण्यात आली.गावात सेवा देणाऱ्या सर्व सफाई कामगारांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान सुद्धा करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा,रामायणावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा,टाकाऊ वस्तूंपासून बनविण्यात आलेल्या टिकाऊ वस्तूंची प्रदर्शनी,कोन बनेगा करोडपती आदी मनोरंजन आणि ज्ञानवर्धक स्पर्धांचे आयोजन दररोज करण्यात येत आहे.विजयी स्पर्धकांना १६ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण सुद्धा करण्यातयेणार आहे.याशिवाय दररोज संध्याकाळी बाप्पांची आरती झाल्यानंतर गावातील लहान मुली व युवतींना दुर्गा नारी आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराअंतर्गत लाठीकाठी, दांडापट्टा, तलवारबाजी, कराटे यांसारख्या पारंपारिक खेळ व स्वरक्षणाचे प्रशिक्षण मंडळाच्या वतीने विनामूल्य देण्यात येत आहे.दररोज शेकडो मुली, युवती या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहे.

●ग्रा.पं. सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार●

संत काशिनाथ महाराज यांच्या जागेचा वाद सुरू असून नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये काशिनाथ धामच्या बाजूने असणाऱ्या सरपंच कविता डांगे,ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे, सदस्य आशा चंदेल, वृषाली इंगळे, उर्मिला गायगोले,विभा देशमुख, मंदा कापडे,वंदना भटकर,शिवराजसिंह राठोड,छत्रपती पटके,बलविर चव्हाण,गोलू नागापुरे,जगदीश इंगोले या बारा सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!