शुभम काळे यांच्या कळील गणेश मूर्ती ठरत आहे आकर्षण
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधि
सिद्धिविनायक नगर कठोरा नाका अमरावती येथील नागरिक तथा सियाराम कंपनी चे ज्येष्ठ कर्मचारी श्री. शुभम काळे यांच्या कळील बाल गणेशाची मूर्ती अनेकांची आकर्षण ठरत आहे. शुभम काळे यांच्या कळील बाल गणेशाची मूर्ती आई पार्वती समेवत असून मूर्तीची सुबकता व सुंदरता उठून दिसत. आई पार्वती समवेत असणाऱ्या बालगणेशजी यांचे दर्शन घेण्या करिता सिद्धिविनायक नगर निवासी शुभम काळे यांच्या घरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे.