आकाश राठोड महाराष्ट्र उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित.
•मिरर वृत्त
•वर्धा प्रतिनिधी
सगळीकडे “गुलाबी साडी” या गाण्याने धुमाकूळ घातलेला असताना त्या गाण्याचे मुख्य नृत्यदिग्दर्शक आकाश राठोड यांना महाराष्ट्र उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक हा पुरस्कार देऊन सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक माननीय शरद गोरे यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अजय खडसे, स्वागताध्यक्ष कवी नरेंद्र गुळघाणे सुप्रसिद्ध साहित्यिक शिवा प्रधान यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भारतीय साहित्य परिषद पुणे शाखा वर्धा द्वारा आयोजित अखिल भारतीय सतरावे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनामध्ये नृत्य दिग्दर्शक आकाश राठोड यांची निवड पुरस्कार देण्यासाठी पुणे येथील केंद्रीय समितीने केली. आकाश राठोड यांनी महाराष्ट्रातील गाजलेल्या बऱ्याच गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले त्यांचे पहिले नृत्य दिग्दर्शित केलेले गाणे “नागपुरी खर्रा” हे असून या गाण्यांमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा सुप्रसिद्ध स्टार चा समावेश होता. नागपुरी खर्रा या गाण्यानंतर त्यामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही अभिनेत्याने अभिनेत्रीने मागे वळूनच पाहिले नाही त्यांना सतत यश मिळत गेले. आकाश राठोड हे ग्रामीण भागातून आलेले असून अत्यंत संघर्षाने ते कार्य करत आहे. बंजारा डान्स स्टुडिओ या नावाने त्यांचे सर्व कलात्मक उपक्रम सतत चालू असतात. या यशाबद्दल त्यांचे मित्र तथा विद्यार्थी या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.