श्री.सत्यदेव इंग्लिश स्कूल, ठाणा ठुनी येथे भव्य तान्हा बैल पोळा साजरा
•मिरर वृत्त
•तिवसा प्रतिनिधी
श्री. सत्यदेव इंग्लिश स्कूल, ठाणा ठुनी येथे भव्य तान्हा बैल पोळा साजरा करण्यात आल. विद्यार्थांनी शेतकरी वेशभुषा मध्ये आपले बैल जोडीचे सादरीकरण केले. तान्हा पोळ्याच्या माध्यमांतून विद्यार्थांना हसत खेळत बैलाची शेतकऱ्याच्या व पर्यावरणीय दृष्टीकोनातून असलेल्या महत्वा बाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ चंद्रकला ताई वडे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सर्वाधिकरी श्री .दिलीपराव वडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव श्री प्रवीण भाऊ लादे, तसेच श्री. नरेंद्रजी वाकोडे , श्री. खोपे साहेब छोटू भाऊ बगणे हे उपस्थित होते .सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गिफ्ट देवून उत्कृष्ट मातीचे बैल सजावट व वेशभुषा करणाऱ्या विद्यार्थांना पारितोषिक देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मॅडम यांनी केले तर मुख्याध्यापक श्री.सागर दिलीपराव वडे यांनी आभार व्यक्त केले.