एकायन इंग्लिश स्कूल असदपुर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
•मिरर वृत्त
•असदपूर प्रतिनिधी
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. हा दिवस क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाच्या महत्त्वावर भर देतो आणि भारतीय हॉकीमधील मेजर ध्यानचंद यांच्या वारशाचा सन्मान करतो. हे लक्षात ठेवूनच एकायन इंग्लिश स्कूल असदपुर येथे 29 ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला.या दिवशी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजाऊन सांगत विविध क्रीडा प्रकारचे आयोजन केल्या गेले. या दिवशी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी विविध क्रीडा प्राकारात सहभाग घेऊन क्रीडा प्रकार वैयक्तिक तसेच राष्ट्रीय प्रगती करिता महत्वाचेव असल्याचे प्रदर्शित केले.सदर कार्यक्रमाकरिता गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती चे अध्यक्ष तात्यासाहेब उर्फ अंबादास तायडे, सचिव डॉ. शीतल तायडे , एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर च्या संचालिका डॉ स्मिता तायडे,सदस्य श्री. वैभव विलास तायडे यांची उपस्थिती होती .या करीता कु. शिवानी ठाकूर कु. कु.वैष्णवी ठाकरे. कु.नियती गावंडे , सौ. योगीताताई नितनवरे यांनी परिश्रम घेतले.
.