एकायन इंग्लिश स्कूल असदपूर येथे स्वातंत्र दिन उत्सहात साजरा
•मिरर वृत्त
•असदपुर प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांच्या मनांना आकार देणे , नैतिक मूल्ये रुजविने आणि उज्वल भविष्यासाठी जबाबदार नागरिक तयार करणे, शालेय विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती आणि देशावरील प्रेमाची भावना निर्माण करने .राष्ट्रीय अभिमान आणि आपुलकीची भावना वाढविणे .विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य आणि सौहार्द वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती द्वारा संचालित एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वतंत्र दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती चे अध्यक्ष तात्यासाहेब उर्फ अंबादास तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहनृत्य सादर केली, तसेच राम बूब, भावेश सावळे, गणेश गाडगे , अधिराज गिरी या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समयोचित भाषणे दिली तर कु. आर्या काळे , इनायत फातेमा ,अंशुमन बडवाईक , मलाईका फातेमा,साची आरोळे व अनाबिया फातेमा यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. शीतल तायडे , एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर च्या संचालिका तसेच गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती च्या कोषाध्यक्ष डॉ स्मिता तायडे, पालक प्रतिनिधी श्री. रामकीसनजी बूब, श्री. अमोल तेलगोटे, श्री विशाल गावंडे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संचालन कु.वैष्णवी ठाकरे यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन कु. शिवानी ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कु. नियती गावंडे , सौ. योगीताताई नितनवरे यांनी सहकार्य केले.