आजाद समाज पार्टीच्या बाईक रॅलीने वेधले अमरावतीकरांचे लक्ष
●स्वातंत्र्यदिनानिमित्य ध्वजारोहण,मान्यवरांचा सहभाग
●मिररवृत्त
●अमरावती
७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आझाद समाज पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले होते.आझाद समाज पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय येथून निघालेल्या बाईक रॅलीचा लालखडी याठिकाणी समारोप झाला. देशभक्तीपर गीते आणि प्रचंड उत्साहात ही बाईक रॅली काढण्यात आली होती.
आजाद समाज पार्टी जनसंपर्क कार्यालय परिसरात मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण समारोह पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्टीचे मुख्य महासचिव मनीष साठे तर विशेष अतिथी म्हणून लेफ्ट.कमांडर डॉ.अलीम पटेल होते. प्रमुख अतिथीमध्ये कॅ.अविनाश गायकवाड,कॅ.रमेश वडगावकर ,कॅ.अनंत हळवे, कॅ.ज्ञानेश्वर नव्हाळे ,कॅ.राजेंद्र बावनकुळे, कॅ.संघपाल मोहोड, कॅ.महेंद्र ढोणे, कॅ.मनोज सोनटक्के,मनोज वावरे, मनोहर मेश्राम, किरण गुडधे (प्रदेश प्रवक्ता) उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन विपुल चांदे यांनी तर आभार प्रदर्शन सनी चव्हाण यांनी केले.त्यानंतर आजाद समाज पार्टी जनसंपर्क कार्यालय येथून जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण व शहराध्यक्ष विपुल चांदे यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीला सुरुवात होऊन इर्विन चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लालखडी येथे रॅलीचा समारोप झाला.
कोठारी कॉम्प्लेक्स येथील संपूर्ण दुकानदारांनी व परिसरातील अनेक नागरिकांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण,शहराध्यक्ष विपुल चांदे,जिल्हा उपाध्यक्ष विजय सवाई,महासचिव अन्सार,युवा जिल्हाध्यक्ष प्रतीक खडसे,जितेंद्र रामटेके,सुरज रामटेके, संजय गडलिंग,रवींद्र फुले ,लक्ष्मण चाफळकर,रविभाऊ हजारे,रविभाऊ बागडे धम्मपाल पिलावणं, भीम चहांदे, संघर्ष फुले, दीपक खंडारे, अशोक इंगोले, विकी भगत , महेंद्र गायकवाड,दीपक चक्रे, मंगेश बैले, संजय आठवले, गजानन दहिकर, चंद्रकांत मेश्राम,वासुदेव पात्रे, नानासाहेब धुळे,अक्षय पांडे, मंगेश जाधव, भगवान दांडेकर, चंद्रशेखर बिंदोड, धम्मपाल मेश्राम,राजरत्न चंडिकापुरे ,जगन वावरे, तुषार हगवणे,संदेश गणेश,मनोज खोब्रागडे,नंदकिशोर पळसपगार,नरेश वानखडे ,राजेश बुरघाटे,राजेश कठाळे, सागर मोहोळ,अतुल गायगोले, दीपक चोरपगार,नंदू चोपडे,गौरव शिरसाठ,शेख जमीर,हंसराज मेश्राम,मयूर जाधव, लक्ष्मण वाघमारे,प्रज्ञा दांडगे, ज्योती बोरकर, वंदना बोरकर, मुनजशीर शहा, राज गडलींग, सलमान शेख, श्रीकांत जामनिक, सुरेंद्र नितनवरे,सनी पाटील,अन्सार बेग,जंजीरसिंग टांक मीनात नागदिवे आदींनी परिश्रम घेतले.