देशाचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य
●प्राचार्य अरविंद घोम यांचे प्रतिपादन
●अजाबराव काळे पाटील विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
●मिररवृत्त
●अमरावती
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. आज इतर देशांच्या तुलनेत आपण अधिक सक्षम आणि बळकट झालेलो आहोत. आजचा युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे.देशाच्या नेतृत्वाची धुरा युवकांच्या हाती असणार आहे त्यामुळे देशाचा सन्मान आणि स्वाभिमान जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन प्राचार्य अरविंद घोम यांनी केले. स्वातंत्र्यवीर श्री.अजाबराव काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चुरणी येथील ७८ व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्याप्रसंगी ते बोलत होते.
विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नारायण चिमोटे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच आशिष टाले,नरेंद्र अलोकार,बलरामजी वर्मा, पुनाजी सेलुकर उपस्थित होते.सकाळी नियोजित वेळेवर पुनाजी सेलूकर यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची समायोचित भाषणे झाली.उपस्थित मान्यवरांनी सुद्धा यावेळी स्वातंत्र्यदिनावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात येत असतो.
यावेळी कार्यक्रमाला पोलिस पाटील गोकुल झारखंडे, , गोकुल अलोकार, ग्रा.पं.सदस्य रवी सेमलकर ,अरविंद टाले, रूपेश भक्ते, पत्रकार नितीन वरखडे, आंबेडकर, आठवले यांचेसह माजी विद्यार्थी, पालकवर्ग, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रविकुमार देशमुख, कीशोर बोकडे, प्रमोद मुंदाने, देवेंद्र भोरे, संजय काळे, भिमराव खंडारे, विठ्ठल मांगे, रमेश धोटे, सुनील भास्कर, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी दिपक घोम, वासुदेव अलोकार, अरुण भामोद्रे, जोगी बेठेकर यांनी परिश्रम घेतले.