spot_img

अमरावतीत तेली समाज राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन, श्री संताजी समाज विकास संस्थेचा उपक्रम

अमरावतीत तेली समाज राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन

●श्री संताजी समाज विकास संस्थेचा उपक्रम

●मिररवृत्त
●अमरावतती

तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे येत्या 29 सप्टेंबर रोजी सर्व शाखीय तेली समाजातील उपवर- वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री संताजी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांनी दिली.
तेली समाजाच्या विकासासाठी सदैव अग्रेसर राहणाऱ्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .पंचवटी चौक स्थित पीडीएमसीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यास राज्यातील सर्व जिल्ह्यातील तेली समाज बांधव सहभागी होणार असून या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले ,उपाध्यक्ष मिलिंद शिरभाते, नंदकिशोर शिरभाते ,कोषाध्यक्ष प्रा .डॉ. अनुप शिरभाते, सचिव प्रा. सुनील जयसिंगपूरे व कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. प्रकाश पजगाडे ,डॉ. विजय अजमिरे ,आशिष आगरकर, विलास शिरभाते हे परिश्रम घेत आहे .

◆संस्थेने जपले सामाजिक दायित्व ; प्रा.आसोले◆

आजच्या धावपळीच्या जीवनात लग्नही समस्या अधिक बिकट होत चालली असून उपवर -वधू संशोधन करणे ही जिकरीची बाब झाली आहे. समाज बांधवांना भेडसावणारी ही समस्या लक्षात घेता श्री संताजी समाज विकास संस्थेने नेहमीप्रमाणे आपले सामाजिक दायित्व जपत यावर्षी देखील पुढाकार घेत तेली समाज राज्यस्तरीय उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. गेल्या 14 वर्षापासून संस्था सातत्याने परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असून या मेळाव्याच्या माध्यमातून उपवर वधू संशोधन करणाऱ्या पालकांना एकाच ठिकाणी अनेक स्थळांची माहिती मिळत असल्यामुळे त्यांची मोठ्या त्रासातून सुटका झाली आहे. परिणामी या मेळाव्याच्या आयोजनातून शेकडो विवाह जुळल्याचा दावा प्रा संजय आसोले यांनी करीत तेली समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे.

◆विवाहबंधन विशेषांकाचे होणार प्रकाशन◆

तेली समाज राज्यस्तरीय उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे निमित्ताने सर्व उपवर- वधू यांची सचित्र माहिती असलेला विवाहबंधन हा विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे .त्याकरिता पालकांनी आपल्या विवाह इच्छुक मुला मुलीच्या रंगीत छायाचित्रासह सविस्तर माहिती असलेला बायोडाटा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत 300 रुपये शुल्क भरून श्री संताजी समाज विकास संस्थेच्या जुना बायपास रोड वरील कलोती नगर स्थित कार्यालयात जमा करावा किंवा प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात असलेल्या संकलकांकडे जमा करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती करीता प्रा. संजय आसोले 94020720499 ,मिलिंद शिरभाते 9284240345 ,विनोद अजमिरे ९८९००३०२०९, शंकरराव श्रीराव 9422158769 ,रमेश पंत शिरभाते ९४२२५४८२९६, गंगाधरराव आसोले ९८९०८१२३२४, श्रीरामपंत सुखसोहळे ९४२३४३३७८४, रामभाऊ कावडकर ९४२३१२५३११, अविनाश राजगुरे 9326925531 ,प्रा डॉ. अनुप शिरभाते ९४२१८७४७८७, प्रा. सुनील जयसिंगपुरे ९८२३०५१०४७, संजय रायकर 9021456494 यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!