spot_img

स्वातंत्र्यदिनी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव; पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव; पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी
अमरावती, दि. 12 (जिमाका): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व प्रेमकिशोर सिकची, चॅरीटेबल ट्रस्ट, वलगाव यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव गुरुवार, दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सिकची रिसोर्ट, वलगाव येथे आयोजीत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

रानभाज्यांचे महत्व प्रसारित करणे व विपणन साखळी निर्माण करण्याकरिता सन 2020-21 पासून दरवर्षी रानभाजी महोत्सव आयोजीत करण्यात येते. त्यानुसार यावर्षी महोत्सव क्रांती दिनाचे निमित्याने सप्ताह स्वरूपात दि. 9 ते 15 ऑगष्ट 2024 या कालावधीत साजरा करण्याबाबत सूचना प्राप्त आहेत. शेत शिवारातील नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व जास्तीत जास्त लोकांना माहिती होण्यासाठी तसेच रानभाज्यांची विक्री व्यवस्थेमधून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा करुन देणे या मागचा प्रमुख उद्देश आहे.

दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत सिकची रिसोर्ट, वलगाव येथे आयोजीत जिल्हास्तरीय महोत्सवामध्ये आत्मामार्फत स्थापित शेतकरी गटाचे रानभाज्या तसेच भरडधान्य विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचा लाभ रानभाजी उत्पादक, विक्रेते शेतकरी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केलेले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!