भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महाविद्यालयात डॉ. एस. आर.रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी
शिवाई सोशल अँड मेडिकल ट्रस्ट द्वारा संचालित भारतरत् डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज फॉर युजी अँड पीजी कोर्सेस विथ मिलेलियम स्किल्स इनोवेशन इंक्युबॅशन अँड रिसर्च महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा काकडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. पल्लवी मांडवगळे होत्या. तसेच प्रमुख वक्ता म्हणून सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ग्रंथपाल प्रा. राखी गचके या होत्या.
मान्यवरांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण व दीप प्रज्वलन केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. निखिल नार्लावार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करूनदिला, विद्यार्थ्यांना ग्रंथ आणि ग्रंथालया विषयी तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवना विषय माहिती देण्यात आल्या.
प्रमुख वक्ता राखी गचके यांनी ‘डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या भारतीय ग्रंथालयासाठी योगदान तसेच ग्रंथालयाचे ५ नियम व वर्गीकरण पध्दती विषयी माहीती विद्यार्थीना दिली सोबतच ग्रंथ कसा आपल्या यशासाठी उपयुक्त ठरू शकतो, हे प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा काकडे यांनी ग्रंथालयाचे महत्व व ग्रंथ कसे वापरावे या विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा ठाकरे व आभार प्रदर्शन मंथन चोपकार या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा.मयुरी गोबाडे, प्रा. राहुल शेंडे, हेमंत धर्माळे व आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.