एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर येथे ‘द मान्सून डे’ साजरा
•मिररवृत्त
•अमरावती प्रतिनिधी
प्रत्येकजण पावसाळ्याचा आनंद घेतो. मान्सून ऋतू या पृथ्वीवरील प्रत्येकाला नवीन जीवन देतो. लहान मुले पावसाच्या पाण्यात भिजून पावसाळ्याचा आनंद लुटतात.एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर येथे दिनांक ५ ऑगस्ट , २०२४ रोजी मुलांना पाऊस आणि पावसाळ्याच्या ऋतूची ओळख करून देण्यासाठी ‘द मान्सून डे’ साजरा केला. या दिवशी संपूर्ण वर्गखोल्या पावसाळी आणि ढगाळ वातावरण समजाऊन देण्याकरिता सजविण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना रेनकोट घालण्यास आणि छत्री बाळगण्यास प्रोत्साहित करण्यात आले. या प्रसंगी रेन डान्स व व रेन सॉंगमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी कारून घेण्यात आले .तसेच विद्यार्थ्यांना हवामानाचे बारकाईने निरीक्षण करण्यास देखील प्रोत्साहित केले गेले. सदर उपक्रम एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर च्या संचालिका डॉ स्मिता तायडे यांचे मार्गदर्शनाखाली कु.वैष्णवी ठाकरे , कु. शिवानी ठाकूर , कु. नियती गावंडे व सौ. योगीताताई नितनवरे यांनी यशस्वी रीत्या आयोजित करण्यात आला.