spot_img

मनोज जरांगे हे शरद पवार यांचे बोलविते धनी,ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई, नांदगाव खंडेश्वर येथील सभेत प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आता आरपारची लढाई

●महाविकास आघाडी व महायुती दोघेही एकाच माळेचे मणी

●मनोज जरांगे हे शरद पवार यांचे बोलविते धनी

●नांदगाव खंडेश्वर येथील सभेत प्रकाश आंबेडकरांचा घनाघात

●मिररवृत्त
●नांदगाव खंडेश्वर

ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांचा आरक्षण देण्याचा जो पोरखेळ मनोज जरांगे खेळत आहे तो डाव शरद पवारांचा आहे. मनोज जरांगे हे शरद पवारांचे हस्तक आहे व महाविकास आघाडी आणि महायुतीने ओबीसींना फसवण्याचे काम केले असून जर आपण वेळीच सतर्क झालो नाही तर ओबीसी आरक्षण खुंटीवर टांगल्या जाईल त्यासाठी आता आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आरपारची लढाई करावी लागेल असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी नांदगाव खंडेश्वर येथे झालेल्या जाहीर सभेत केले
ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर नांदगाव खंडेश्वर येथे आले असता वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली.शहरातील देशमुख मंगलम येथे पार पडलेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर आता बहुजन वंचित आघाडी हा एकमेव पर्याय असून बाकी इतर पक्ष फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आरपारची लढाई लढत असून सर्व ओबीसी समाज बांधवांनी या आरक्षण बचाव लढ्यात सहभागी होऊन आपला हक्क कायम ठेवण्यासाठी ही लढाई लढायची आहे.जर आपल्याला ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर ओबीसी उमेदवारांना भरगच्च मते देऊन पूर्ण ताकतीने निवडून आणणे गरजेचे आहे व त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व समावेशक सर्व जाती-धर्माच्या ओबीसी बांधवांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार आहे. त्यासाठी सर्व ओबीसी समाजातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकतीने उभे राहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर धामणगाव विधानसभा उमेदवार तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, अभय पवार, एकनाथ शिंदे, आनंद कडूकार, प्रवीण खेडकर, प्रशांत बोबडे, किशोर केने, श्रीकांत भोयर, अविनाश भोसीकर, लालचंद इंगोले, रोशन गाडेकर, यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने समुदाय उपस्थित होता.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!