राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये अमरावतीच्या संघाने पटकावला द्वितीय क्रमांक
•मिरर वृत्त
•अमरावती प्रतिनिधी:-
डिझायर डान्स स्टुडिओ कारंजा (लाड) द्वारा कारंजा नृत्य महोत्सव 2024 राज्यस्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये अमरावती येथील वॉरियर्स डान्स अकॅडमी चे संचालक सागर घोघरे यांच्या नेतृत्वा मध्ये वॉरियर्स डान्स अकॅडमी च्या चमू ने द्वितीय क्रमांक पटकावून पुन्हा एकदा अमरावती च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून 70 डान्स क्लासेस ने सहभाग नोंदविला होता ज्या मध्ये अमरावती च्या संघाने घवघवीत यश संपादन केले. यावेळी विजेता संघाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. समूह नृत्या मध्ये जुई अमोल काळे, आराध्या निमकर, मृण्मयी वेचे, इरा बोंडे, आस्वी, अन्वी अलोने, शरववरी आलोने, शर्वरी निर्मल, रितवी आवरे यांनी सहभाग नोंदविला. विजेत्या चमुचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.