जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी विवेक गुल्हाने यांची नियुक्ती
●मिररवृत्त
●अमरावती
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असलेले विवेक गुल्हाने यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ही नियुक्ती केली.
विवेक गुल्हाने अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय आणि एकनिष्ठ पदाधिकारी आहेत.खा.अनिल बोंडे,माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे अतिशय विश्वासू म्हणून सुद्धा ते परिचित आहेत.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विवेक गुल्हाने यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत नांदगाव पेठ सर्कल मध्ये भाजप उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेतली. सामाजिक कार्यात सुद्धा विवेक गुल्हाने सक्रिय असून अनेक गोरगरीब, गरजू, विद्यार्थी, वंचित घटकांसाठी ते निस्वार्थ कार्य करतात.
विकासाचे व्हिजन असलेल्या विवेक गुल्हाने यांची ही नियुक्ती अनेक विकासात्मक कार्याला गती देईल असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला.विवेक गुल्हाने यांची नियोजन समितीवर नियुक्ती होताच राजकीय, सामाजिक, क्रीडा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.