महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे राष्ट्रवादीचे आंदोलन
●वर्षा भटकर यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात निदर्शने
●मिररवृत्त
●अमरावती
महाराष्ट्रात वारंवार महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे,पोलीस प्रशासन, गृह विभाग अश्या घटना रोखण्यास असमर्थ असून वारंवार होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले. अमरावती शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा शहर अध्यक्षा वर्षा भटकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, राज्यात रोज महिलांवर अत्याचार वाढत आहे पण शिंदे सरकार कुंभकर्णी झोपेत असुन राज्यातील गृहमंत्री मात्र केंद्रीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यात व्यस्त आहे, इतके कमकुवत गृहमंत्री आज पर्यंत या महाराष्ट्रातील जनतेने बघितले नाही अशा शब्दात वर्षा भटकर यांनी शिंदे सरकारचा यावेळी समाचार घेतला.राजकमल चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देऊन महिलांना सुरक्षा देण्याची केली आहे.
यावेळी आंदोलनात वर्षा भटकर यांचेसह डॉ.दिव्या सिसोदे, वर्षा गतफने, शिरीन खान (बडनेरा झोन अध्यक्ष), सैय्यद मन्सूर(कार्याध्यक्ष) रोशन कडु(युवक शहर अध्यक्ष),विनेश आडतीया(अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष) दिलबर शहा(सचिव),छाया देशमुख, डॉ स्मिता गुजर, डॉ शितल साखरे,डॉ स्वाती रतने,डॉ श्वेता रोडे,माधुरी कारसरपे, वंदना बोबडे,अनिस खान, मिश्राजी,गौरव वाटाणे मंगेश भटकर यांचेसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते.