spot_img

लाडकी बहीण योजनेसाठी मराठीत केलेले अर्ज ग्राह्य धरा – दिनकर सुंदरकर

लाडकी बहीण योजनेसाठी मराठीत केलेले अर्ज ग्राह्य धरा – दिनकर सुंदरकर

●मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली मागणी

●मिररवृत्त
●अमरावती

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना राबवण्याची योजना राज्य सरकारने आखली असून ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे तर योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा लाभ हा त्यांच्या जीवनात नक्कीच बदल घडवून आणणार आहे मात्र या योजनेअंतर्गत नवीनच चर्चा समोर येत असून महिलांनी केलेले अर्ज हे इंग्रजीमधून भरावे लागणार यामुळे अनेक संभ्रम लाडक्या बहिणीच्या मनात निर्माण झालेला आहे महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा ही अभिजात भाषा असून ॲप मध्ये दिल्याप्रमाणे त्यामध्ये मराठीत नोंदणीचा पर्याय असल्याने शेकडो महिलांनी आपली नोंदणी ही मराठीतच केली आहे मात्र या नोंदणी दरम्यान अनेक लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं तरी पण सर्व कागदपत्रांची पूर्तता करून महिलांनी नोंदणी केली मात्र आता पुन्हा इंग्रजीत नोंदणी फार्म भरावा लागणार असल्याच्या चर्चेने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे तरी मराठीत भरलेला नोंदणी अर्ज महाराष्ट्र राज्यातील मातृभाषेत असून आपण तोच कायम ठेवावा अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर यांनी ईमेल निवेदनाद्वारे केली आहे लाडकी बहीण योजनेकरिता अनेक महिलांनी नोंदणी अर्ज मराठीत भरले आहे.मराठीत भरलेले फार्म हे ग्राह्य धरण्यात यावे हीच अशी आग्रही मागणी दिनकर सुंदरकर यांनी केली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!