spot_img

डॉ. राजरत्न आंबेडकर साहेबांची, डॉ. रवींद्र खंडारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

डॉ. राजरत्न आंबेडकर साहेबांची, डॉ. रवींद्र खंडारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
•मिरर वृत्त:-
•अमरावती प्रतिनिधी:-

दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सांस्कृतिक भवन अमरावती येथे जिल्हा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान बचाव व आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या आरक्षण बचाव परिषदेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक मा. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी संबोधित केले. संविधान बचाव व आरक्षण हक्क परिषद संपल्यानंतर डॉ. राजरत्न आंबेडकर साहेबांनी डॉ. रवींद्र खंडारे आंबेडकरी विचारवंत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ साहेबांचे औक्षण करून शाल पुष्पगुच्छ तसेच शोध ग्रंथ भेट देऊन डॉ. रवींद्र खंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या महत्त्वपूर्ण चर्चेत डॉ. रवींद्र खंडारे, ॲड. दीपक सरदार , मा. सतीश प्रधान, जिल्हाध्यक्ष रिपाई दहीकर साहेब, भाऊसाहेब सरकटे, प्रसेंनजित सरदार, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, उपाध्यक्ष रिपाई ,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, राजाभाऊ गुडधे विदर्भ प्रदेशअध्यक्ष, किशोर मानकर, दिलीप डोंगरे, शेषराव राजनेकर, काशिनाथ गजभिये, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच या चर्चासत्रामध्ये शहरातील साहित्यिक विचारवंत व ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले. महाराष्ट्रातील बेरोजगारी शिक्षण आरोग्य शेतकऱ्यांच्या समस्या स्थानिक समस्या अशा विविध विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. पक्ष वाढीसाठी व विविध समस्यांच्या निराकरणासाठी सर्वांनी निर्धार केला. सर्व उपेक्षित शोषित, निराधार व गरजवंत समाजाला डॉ. राजरत्न साहेबांचे नेतृत्व उपलब्ध झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. डॉ. राजरत्न साहेबांनी निवासस्थानी भेट दिल्याबद्दल डॉ. रवींद्र खंडारे यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर चर्चा सत्राची सांगता करण्यात आली व पुढील प्रवासासाठी डॉ. राजरत्न साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!