spot_img

स्टेजवरून तोल गेल्याने रुग्णसेवकाची प्राणज्योत मालवली,चांदुर बाजार येथील घटना,नांदगाव पेठ मध्ये हळहळ

स्टेजवरून तोल गेल्याने रुग्णसेवकाची प्राणज्योत मालवली

●चांदुर बाजार येथील घटना,नांदगाव पेठ मध्ये हळहळ

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

स्वागतसमारंभाच्या स्टेजवर कुटुंबासोबत छायाचित्र घेण्यासाठी जात असतांना स्टेजवरून तोल गेल्याने झालेल्या अपघातात एका रुग्णसेवकाची प्राणज्योत मालवली. योगेश जयवंत आसरकर (४८) रा. नांदगाव पेठ असे त्या रुग्णसेवक युवकाचे नाव आहे.चांदुर बाजार येथील एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान १५ जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. घटनेने संपूर्ण नांदगाव पेठ मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कार्यरत असलेले योगेश आसरकर यांनी आजवर अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. गंभीर रुग्णांना तातडीने मदत करणे, त्यांना योजनेचा परिपूर्ण लाभ मिळवून देणे तसेच रूग्णांना यथोचित मार्गदर्शन करणे यामुळे कोणत्याही रुग्णाला मदत लागली तर योगेश यांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरू होते.१४ जुलै ला चांदुर बाजार येथील त्यांच्या नातेवाईकांकडे लग्न होते व १५ जुलै ला स्वागतसमारंभ होता. स्वागतसमारंभाच्या दिवशी रात्रीसाडे दहा वाजताच्या दरम्यान ते कौटुंबिक छायाचित्र काढण्यासाठी स्टेज वर जात असतांना अचानक त्यांचा तोल गेला व डोक्यावर पडल्याने त्यांना तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांची उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.
मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनानंतर स्थानिक हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. योगेश यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!