spot_img

आरोग्य सहाय्यक निरीक्षक संघटनेचे मुंबई येथे लक्षवेध आंदोलन, मंत्रालयाने घेतली दखल

आरोग्य सहाय्यक निरीक्षक संघटनेचे मुंबई येथे लक्षवेध आंदोलन

मंत्रालयाने घेतली दखल

●मिररवृत्त
●मुंबई

महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक/निरीक्षक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय लक्षवेध धरणे आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. संघटनेने विविध मागण्या संदर्भात संस्थापक /राज्याध्यक्ष धर्मा वानखडे यांचे नेतृत्वाखाली एक दिवसीय लक्षवेध आंदोलन पुकारले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून झाली.
वेतन त्रुटी दूर करणे ही प्रमुख मागणी घेऊन, तसेच कायम प्रवास भत्त्यात वाढ करणे, अति दुर्गम भागात कार्य करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना हार्डशीप भत्ता मिळणे, जोखीम भत्ता मिळणे, आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती देताना फक्त आरोग्य सहाय्यक निरीक्षक कॅडर मधूनच देणे, प्रत्येक जिल्हास्तरावर आरोग्य भवन उभारने, पदनामत बदल करणे, राज्यस्तरीय आरोग्य निरीक्षक यांना बदली संदर्भात 53 वर्षाची सूट मिळणे अशा असंख्य मागण्या घेऊन हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आरोग्य सहाय्यक, निरीक्षक आझाद मैदानावर लक्षवेध आंदोलन करता भर पावसात दाखल होते.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता मंत्रालयामध्ये त्याच दिवशी दखल घेण्यात आली.आरोग्य मंत्री नामदार तानाजी सावंत आणि आरोग्य सचिव हे विधान परिषदेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने पोलीस प्रशासनाने श्री अनिल कुमेरीये कार्यासन अधिकारी यांची यशस्वीरित्या भेट घालून दिली अर्धा तास मागण्यावर चर्चा करण्यात आली. वेतन त्रुटी तसेच इतर मागण्या पुरेपूर सोडविण्याचा शासन प्रशासन प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आले. परंतु मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर सुद्धा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा संघटनेने दिला
निवेदन देते वेळी अध्यक्ष धर्मा वानखडे यांच्यासह सचिव अमर तायडे, विभाग अध्यक्ष राजेश राठोड जिल्हा सचिव रमेश देशमुख जिल्हा अध्यक्ष संजय सहारे इत्यादी पदाधिकारी हजर होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!