spot_img

घरकुलच्या दुसऱ्या हप्त्यासाठी चार महिन्यांपासून पायपीट, लाभार्थ्यांची पंचायत समितीवर धडक,प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा

घरकुलच्या दुसऱ्या हप्त्यासाठी चार महिन्यांपासून पायपीट

●लाभार्थ्यांची पंचायत समितीवर धडक
●प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत विभागाकडून लाभार्थ्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.पीएम फंडात पैसे नसल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.पहिला हप्ता मिळाला मात्र चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने शनिवारी नांदगाव पेठ येथील शेकडो लाभार्थ्यांनी अमरावती पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली.
युवासेना जिल्हा सरचिटणीस प्रा. मोरेश्वर इंगळे, ग्रा.पं.सदस्य वृषाली इंगळे यांच्या नेतृत्वात अमरावती पंचायत समितीवर शनिवारी धडक देण्यात आली. चार महिन्यांपासून घरकुलचा हप्ता देण्यात न आल्याने लाभार्थी प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जात आहे. घरकुल बांधकाम सुरू असल्याने लाभार्थी भाड्याच्या खोलीत राहत आहे. हप्ता न मिळल्याने मजूर वर्ग सुद्धा काम करायला तयार नाहीत अश्या परिस्थितीत लाभार्थ्यांना वेठीस धरून पंचायत समिती नेमके काय साध्य करत आहे असा सवाल प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी उपस्थित केला.
शासन एकीकडे गोरगरिबांसाठी विविध योजना राबवत आहे मात्र अधिकारी आणि कर्मचारी त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरत असल्याचा आरोप सुद्धा प्रा.इंगळे यांनी यावेळी केला. लाभार्थ्यांना तातडीने घरकुलचा हप्ता वितरित करण्यातयावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर लाभार्थ्यांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी दिला आहे. यावेळी चंद्रकला गणेशराव शेंदरकर,नलिनी महादेवराव जवंजाळकर, शांताबाई महादेव राऊत, नारायण ठवकर, वर्षा शेंदरकर, राजेंद्र इंगळे, अलका सुंदरकर, सुनील राऊत, मोहन शेंदरकर,कार्तिक बारस्कर,नामदेव चांदूरकर यांच्यासह असंख्य लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!