spot_img

माहूली जहागीर येथील दंगा प्रकरणातील 73 आरोपींची निर्दोष सुटका, साहिल डायरे अपघात प्रकरण

माहूली जहागीर येथील दंगा प्रकरणातील 73 आरोपींची निर्दोष सुटका

◆साहिल डायरे अपघात प्रकरण

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

माहूली जहागीर येथे गेल्या नऊ वर्षांपूर्वी एका बारा वर्षे शाळकरी मुलाचा एस टी बसने चिरडल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आंदोलन करीत पोलिसांवर दगडफेक केली आणि तोडफोड केली होती. परिणामी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार देखील केला होता.या बहुचर्चित दंगा प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन 73 आरोपींची अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली .
दोषारोपत्रानुसार 25 ऑगस्ट 2015 रोजी माहूली जहागीर बस स्थानकावर एसटी बसने साहिल डायरे नामक बारा वर्षीय विद्यार्थ्यास चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बसची तोडफोड करीत प्रचंड दगडफेक केली तसेच आग देखील लावण्यात आली होती. जमावाला पांगवण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी दगडफेक करीत अग्निशमन दलाच्या गाडीची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.यावेळी संतप्त झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करीत गोळीबार देखील केला होता. सदर प्रकरणी एएसआय बबन ढगे यांच्या तक्रारीवरून माऊली जहागीर पोलिसांनी योगेश येवतकर , रवी पेठेकर, दीपक सुरळकर व अन्य 500 ते 600 लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. हे प्रकरण अंतिम सुनावणी करिता जिल्हा व सत्र न्यायाधीश मोडक यांच्या न्यायालयासमोर ठेवण्यात आले असता सरकारी बाजूने एकूण नऊ साक्षीदार तपासले. या प्रकरणातील आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असून पोलिसांवर दगडफेक करून त्यांना मारहाण केल्याचे तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. बचाव पक्षातर्फे ॲड प्रशांत भेलांडे यांनी युक्तिवाद केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून वरील सर्व आरोपीं विरुद्ध कुठलाही सबळ पुरावा न आढळल्याने संपूर्ण 73 आरोपींची जिल्हा सत्र न्यायाधीश मोडक यांनी निर्दोष मुक्तता केली. ॲड प्रशांत भेलांडे यांना याप्रकरणी ॲड रोहित उपाध्याय, ॲड प्रसाद धाकुलकर , ॲड प्रवीण राऊत यांनी सहकार्य केले.

●आरोपिंना गोवण्याचा प्रयत्न – ॲड प्रशांत भेलांडे●

ॲड प्रशांत भेलांडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयामध्ये सांगितले की शेकडोंचा जमाव असताना पोलिसांनी केवळ 73 लोकांनाच आरोपी कसे बनविले. विशेष म्हणजे या आरोपींमधील योगेश येवतकर . रवी पेडेकर, दीपक सुरळकर, छत्रपती सपकाळ, किशोर लंगडे ,प्रदीप भोणे,, किशोर ठाकूर, मोहम्मद सुभान, संजय गोरडकर, सचिन पेठेकर, गजानन रायते, अक्षय वनवे, आकाश गुल्हाने व इतर लोक हे घटनास्थळावर उपस्थित नव्हतेच. सदर आरोपींना पोलिसांनी खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला हे ॲड प्रशांत भेलांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा हा प्रबळ युक्तिवाद न्यायालयाने मान्य करीत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!