spot_img

ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व क्षेत्रात अग्रेसर- प्रा.हेमंत देशमुख , संजय देशमुख यांचा हृदयस्पर्शी सत्कार

ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व क्षेत्रात अग्रेसर- प्रा.हेमंत देशमुख

संजय देशमुख यांचा हृदयस्पर्शी सत्कार

शालेय साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण करून साजरा केला कृतज्ञता सोहळा

◆मिररवृत्त
◆अमरावती

शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी केलेला सत्कार हा खऱ्या अर्थाने त्या शिक्षकाच्या यशाची पावती असते. शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आज उत्तुंग झेप घेतली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव निपाणी येथील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित कृतज्ञ सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून प्रा. डॉ. हेमंत देशमुख बोलत होते. माध्यमिक विद्यालय पिंपळगाव निपाणी येथील आदर्श शिक्षक श्री संजय देशमुख हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव निपाणी येथील मुख्याध्यापक शरद पवार होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती संजय देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ .रंजना देशमुख, सरपंच सिंधुताई गजभिये, संजय अनासने यांची उपस्थिती होती. संजय देशमुख यांनी पिंपळगाव निपाणी येथील माध्यमिक शाळेत जवळपास 30 वर्ष प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने माजी विद्यार्थी व गावकरी मंडळीच्या वतीने कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय देशमुख यांचा संपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रादरम्यान पुढे बोलताना डॉ. हेमंत देशमुख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशाचे धडे दिले सोबतच विद्यार्थ्यांना समाजशास्त्रज्ञ स्व. एम. आर. देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय देशमुख यांना गहिवरून आले त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक हा निस्वार्थी भावनेने आपले कार्य करतो त्यांचे विद्यार्थी ही त्या शिक्षकांची ओळख असते. विद्यार्थ्यांचे यश म्हणजे शिक्षकांचे यश आहे. आई-वडिलांनंतर मुलांवर तथा विद्यार्थ्यांवर सर्वाधिक संस्कार करणारी व्यक्ती म्हणून शिक्षकांना पाहिले जाते. विद्यार्थ्यांनी सत्कार घेऊन असं कृतज्ञ झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.सोबतच तीस वर्षाच्या प्रवासात सर्वच गावकरी मंडळीचे मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक शरद पवार यांनी संजय देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला.संजय देशमुख यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल घवळे, संचालन मयूर चौधरी व आभार प्रदर्शन सरपंच मंगेश कांबळे यांनी केले. हनुमंत देवकथे ,अरुण बनकर,चंद्रमणी नागदिवे, प्रदीप राऊत, गोपालराव मोहागे,दिनेश पाटील,आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले.कार्यक्रमाला गावकरी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!