spot_img

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मार्गावर काचेचा खच, मद्यपींचा धिंगाणा,रस्त्यावर फोडल्या काचेच्या बाटल्या

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मार्गावर काचेचा खच

◆मद्यपींचा धिंगाणा,रस्त्यावर फोडल्या काचेच्या बाटल्या

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

येथील युवक, युवती पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी ज्या मार्गाचा वापर करतात त्याच मार्गावर मद्यपींनी धिंगाणा घालून काचेच्या बाटल्या फोडल्या. राधा सिटी तसेच इंडेन गॅस गोडावून समोर असलेल्या ले आउट मध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून यामुळे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवक, युवती तसेच पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
नांदगाव पेठ मधील युवक, युवती राधा सिटी तसेच कठोरा गांधी मार्गावर असलेल्या ले आउट मध्ये पहाटे पोलीस भरतीचा सराव तसेच मॉर्निंग वॉकला जातात.पहाटे काळोख असतांना गावातील नागरिक याठिकाणी फिरायला जातात.दोन दिवसांपूर्वी याठिकाणी सराव करण्याकरिता गेलेल्या युवकांना रस्त्यावर सर्वत्र काचेचा खच दिसला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही मात्र या घटनेचा अनेकांनी संताप व्यक्त केला. ग्रामपंचायत सदस्य छत्रपती पटके यांनी बुधवारी याबाबत नवनियुक्त ठाणेदार रेखा लोंडे यांना समाजमाध्यमाद्वारे याप्रकरणी कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे.
प्रहार पक्ष शाखा नांदगाव पेठच्या वतीने सुद्धा बुधवारी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन राधा सिटी तसेच कठोरा गांधी मार्गावर रात्रीची गस्त घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ठाणेदार यांना निवेदन देतांना प्रहारचे तालुकाप्रमुख योगेश राऊत, शाखाप्रमुख भूषण धर्मे, रुग्णसेवक अभिजित बानासुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!