spot_img

भटकंती समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल करा – दिनकर सुंदरकर,जन्माची नोंद नसल्याने वंचित ठेऊ नका

भटकंती समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल करा -दिनकर सुंदरकर

◆जन्माची नोंद नसल्याने वंचित ठेऊ नका

◆मिररवृत्त
◆अमरावती

राज्यात सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली मात्र या योजनेत अनेक सभ्रम असल्याने महिलामध्ये दिसून आले तर राज्यातील भटकंती करणाऱ्या समाजाकडे जन्माची नोंद व शाळा सोडण्याचा दाखला नसल्याने त्यांना या योजनेतील अटी शिथिल कराव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
राज्यातील अनेक समाज हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वहासाठी तर काही समाज आपल्या व्यवसायासाठी राज्यभर फिरत असतात त्या दरम्यान महिलांची प्रसूती झाली तर बेड्यावर, पाड्यावर,शेतात किंवा गावापासून लांब ठिकाणी झालेल्या आहेत, त्यामुळे सरकारी दप्तरी जन्म तारीख व जनमस्थानाची नोंद नसल्याने अनेकांचे आधार कार्ड निघाले नाही तर त्यामुळे लाडली बहीण योजनेसह अनेक लाभापासून महिला पुरुष विद्यार्थी यांना
वंचित रहावे लागत असून सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कात्यकर्ते दिनकर सुंदरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तर सेतू व सीएस्सी सेंटर मधून लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र लिंक जाहीर करावी तर सामान्य ऍपमधून नोंदणीची कोणतीच खात्रीशीर नोंद झाल्याची खात्री होत नसून त्याबाबतीत सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे दिनकर सुंदरकर यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!