spot_img

प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला धरले धारेवर, ग्रामसभेत ओढले अधिकाऱ्यावर ताशेरे,नागरिक संतप्त

प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला धरले धारेवर

◆ग्रामसभेत ओढले अधिकाऱ्यावर ताशेरे,नागरिक संतप्त

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त नागरिकांनी आज ग्रामसभेत महावितरण अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले.युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी महावितरणचे शाखा अभियंता बेहरे यांना धारेवर धरत सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे नुकसान झाल्याचा आरोप केला तर ग्रामसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी अनेकदा पत्र देऊन सुद्धा महावितरणचे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याचीमागणी सुद्धा प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी केली.
संपूर्ण उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा नियमित वीजपुरवठा होत नसून दिवसातून वीस ते पंचवीस वेळा वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी प्रतिसाद देत नाही शिवाय वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणे सुद्धा खराब झाली आहे. त्यामुळे आज झालेल्या ग्रामसभेमध्ये संतप्त नागरिकांसह प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी महावितरण अभियंता बेहरे यांना याबाबत जाब विचारला.
बेहरे यांनी ग्रामसभेत वीज पुरवठा होण्याची विविध कारणे सांगितली.परिसर मोठा असल्याने तसेच कर्मचारी वर्ग कमी असल्याने सुद्धा ही समस्या उद्भवत असल्याचेत्यांनी ग्रामसभेत कबुल केले. एकाच वेळी अनेक ठिकाणी विजेची समस्या निर्माण झाल्यास दुसऱ्या ठिकाणी पोहचणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यावर सुद्धा कामाचा ताण असून आम्ही नांदगाववासीयांच्या सेवेत यानंतर कुठलीही कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन बेहरे यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळीग्रामसभेला सरपंच कविता डांगे,ग्रा.पं. सदस्य वृषाली इंगळे,विभा देशमुख, आशा चंदेल,ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांचेसह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!