spot_img

जि.प.उर्दू शाळा माहुली जहागीरला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट

जि.प.उर्दू शाळा माहुली जहागीरला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट

◆मिररवृत्त
◆अमरावती

नवीन शैक्षणिक सूत्र सन 2028 २५ ला १ जुलै पासून सुरुवात झाली शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते प्रवेश उत्सव निमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, भाप्रसे राऊत, यांनी अमरावती प.स. अंतर्गत जि.प. उर्दू उच्च प्राथ. शाळा माहुली जहागीर येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना पाठ्य- पुस्तकांचे वाटप करण्यात आले
या प्रसंगी शालेय आवारात मान्यवरांच हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेत राबविण्यात येणारे उपक्रमा विषयी समाधान व्यक्त केले. सेतू अभ्यासक्रमा विषयी आढावा घेतला आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे कौतूक केले या प्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथ.) बुद्धभूषण सोनोने अमरावती प.स.चे गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी खांडेकर साहेब. शालेय पोषण आहार अधीक्षक गायकवाड साहेब, बोकाडे साहेब, नांदगावपेठ परिक्षेत्राचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल डाखोरे. गावाचे सरपंच प्रिती बंदिले उपसरपंच अब्दुल अन्सार, जि.प. माहुली जागीर येथील मुख्याध्यापक अफसर खान, स. शि. जमील अहेमद प.शि. अब्दुल जब्बार, सरफराज खान, नाजिम अली, अब्दुल अज़हर, यासमीन परवीन, नाजिया परवीन गावातील पालकवर्ग आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी निंभोरकर यांनी केले यांनी मानले तर आभार उपसरपंच अब्दुल अन्सार यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!