आदिवासी आमदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राची SIT मार्फत चौकशी करा
१४ आमदार व २ खासदार चे मतदारसंघ रद्द करा
‘ऑफ्रोह’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
◆मिररवृत्त
●अमरावती
अनुसूचित जमाती क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या मोघे, पुरके, वळवी, पाडवी ई.’बोगस’ आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राची SIT मार्फत चौकशी करावी व अनु जमाती च्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांना लावलेला तांत्रिक खंड रद्द करावा, अनु जमातीसाठी राखीव असलेले १४ आमदार व २ खासदारांचे मतदारसंघ रद्द करावे आदी मागण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्य़ुमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र या संघटनेतर्फे आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
काही ठराविक अनुसूचित जमातीचे अस्सल जात प्रमाणपत्र तपासणी समितीने लबाडीने व फसवणूकीने ‘अवैध’ ठरविण्यात आल्याने अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचा-यांना ‘एक दिवसाचा तांत्रिक खंड’दिल्यामुळे अनेक विभाग वेतनवाढ व वेतनवाढीसह सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे आफ्रोहच्या वतीने ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
यामध्ये अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांची तांत्रिक सेवा खंड रद्द करावा,अनुसूचित जमाती क्षेत्रातील, परप्रांतीय, धर्मांतरण केलेल्यांनी आदिवासींच्या नामसदृश्याचा फायदा घेणा-या वळवी, पाडवी, मोघे, पुरके, गावित, लहामटे, भुसारा, पावरा, उईके, धुर्वे, नाईक, वनगा, दरोडा, पटेल, ईत्यादी बोगस आदिवासींची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी,2000 चा जात प्रमाणपत्र कायदा व 2003 चे नियम रद्द करा,अनु जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या रद्द करा,आदिवासी विकास विभागातील 6400 कोटी रु. च्या भ्रष्टाचाराला जबाबदार असणार्या लोकप्रतिनिधीं वर कार्यवाही करा,अनु जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वर काम करणार्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी,रक्त संबंधात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय अनु जमातीसाठी लागु करा,१४ आमदार व २ खासदार हे सुद्धा बोगस ठरतात.ती आमदार व खासदारांची पदे रद्द करा,अनुसूचित जमातीच्या आमदार व खासदारांचे मतदारसंघांच्या रोटेशन पद्धतीने बदल करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना यावेळी देण्यात आले आहे
या धरणे आंदोलनात ‘ऑफ्रोह’ चे मुख्य मार्गदर्शक डॉ.दीपक केदार, राज्य कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, राज्य सदस्या नीता सोमवंशी,जिल्हाध्यक्ष यशवंत वरूडकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलिमा केदार, सदस्य डॉ प्रमोद पाटणकर, राजेंद्र लिखार, सुषमा हिंगे, प्रिती तिडके, अलका सोरते ,राजेंद्र पाटणकर, रविन्द्र कुंभारे, नरेश मंडलिक, दिनकर कडू, दिलीप आसई, अशोक बेंडे ,गणेश हेडाऊ, संजय तेलंग,गजानन सुर्यवंशी, देवानंद हेडाऊ, राजाभाऊ पराते, देवानंद बोपटे,मोहन नायडू इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.