spot_img

वसईत प्रेयसीची भर दिवसा निर्घृण हत्या,आरोपी गजाआड

वसईत प्रेयसीची भर दिवसा निर्घृण हत्या

◆बघ्याची भूमिका घेतलेल्या लोकांसमोर ती किंचाळली,विव्हळत राहिली,पण इथे माणुसकी मेली

◆आरोपी गजाआड : राज्यभरातून तीव्र निषेध

●मिररवृत्त

◆आशिष राणे,वसई◆

वसईतून मन हेलावून टाकणारी हृदय द्रावक घटना समोर आली आहे. वसईत भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे.
वसईतील वालीव चिंचपाडा स्थित घडलेल्या या भयंकर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रियकराने लोखंडी पान्याने घणाघाती वार करून प्रेयसीची निर्घृण हत्या केली.
मात्र शरमेची बाब अशी की या हिंस्त्र प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला होत असताना येथील सामान्य जनता फक्त बघतच राहिली. तर अर्ध्या हुन अधिक नागरिकांनी या भयंकर घटनेचा व्हिडिओ काढून तो समाज माध्यमातून व्हायरल करण्यात धन्यता मानली असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
वसई पूर्व चिंचपाडा परिसरात मंगळवार दि 18 जून रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव रोहित यादव ( वय 29 )असे आहे.

◆काय काय घडलं नेमकं ?

आरती यादव आणि रोहित यादव गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.तर ब्रेकअप झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रागाच्या भरात या प्रियकराने भररस्त्यात लोखंडी पाना मारण्यास सुरुवात केली.तरुणीला मारहाण करताना घटनास्थळी एकच गर्दी झाली
एका व्यक्तीने या प्रियकराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती या संतापलेल्या प्रियकराला रोखू शकला नाही. या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला सुरुच ठेवला. या हल्ल्यात या तरुणीचा तडफडत मृत्यू झाला आहे. यावेळी रस्त्यावरील लोकही प्रियकराकडे फक्त पाहत राहिले. हत्या करताना घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या तरुणीला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

●काळजाचा थरकाप उडवणारी घटना – सुषमा अंधारे●

वसईमध्ये भररस्त्यात एका तरुणीची हत्या झाल्याचे समजले असता ही काळजाची थरकाप उडवणारी घटना आहे. दिवसाढवळ्या तरुणीची ही हत्या झाली आणि या तरुणीच्या हत्येवेळी लोक बघत राहिले हे सर्व चित्र विदारक आहे. मुंबई शहराजवळ घटना घडते. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राच्या राजधानीजवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे’.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!