spot_img

जेल रोड समाज कल्याण वसतीगृह समस्यांच्या विळख्यात,पाण्याकरीता विद्यार्थीनींची वसतीगृहाबाहेर भटकंती ,सहायक आयुक्तांचा तक्रारींकडे कानाडोळा

जेल रोड समाज कल्याण वसतीगृह समस्यांच्या विळख्यात

●शिकस्त शौचालयाचा वापर:वसतिगृह गृहपाल, स्टाफकडून मुलींचा छळ

●पाण्याकरीता विद्यार्थीनींची वसतीगृहाबाहेर भटकंती

●सहायक आयुक्तांचा तक्रारींकडे कानाडोळा

●मिररवृत्त

●अमरावती

जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाज कल्याण विभागाचे वसतीगृह असून येथे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थींनींची निवास व भोजन व्यवस्था शासनाकडून पुरविण्यात येते. परंतू सद्या अमरावती जिल्ह्यातील वसतीगृहे समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. येथील वसतीगृहात शासन नियमानुसार देण्यात येणाऱ्या सोईसुविधा पुरविणाऱ्या कंत्राटदारांचा मनमानी कारभारांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. विद्यार्थींना पिण्याच्या पाण्याकरीता वसतीगृहात बाहेर भटकंती करावे लागत असल्याची गंभिर बाब समोर आली आहे. वसतीगृहातील खोल्या, कपाटे शिकस्त झाली आहेत. जेल रोड परिसरातील मुलींच्या वसतीगृहातील शौचालयाचे स्लॅब जिर्ण शिकस्त होऊन खाली पडल्याने मुलीना आपला जीव मुठीत घेऊन शौचालयाचा वापर करावा लागने हि अत्यंत शेकांतीकेची बाब आहे. परंतू याकडे गृहपाल जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचाही गंभिर आरोप विद्यार्थिनी कडून केला जात आहे.

वसतीगृहातील स्वयंपाकगृहात स्वच्छतेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणात अनेक वेळा केस, सोंडे तर कधी अळ्या, आढळून येत असून किडलेल्या अन्न धान्यापासून तयार करण्यात आलेले भोजन कंत्राटदारांकडून विद्यार्थ्यांना दिले जात असल्याची बाब समोर आली आहे. वसतीगृहातून काढून टाकण्याच्या भितीने कोणतीही विद्यार्थीनी तक्रार करीत नसून गुपचूप त्रास सहन करीत आहेत. येथील कंत्राटदारांचे वसतीगृह अधिक्षकांशी हितसबंध असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे तेरी भी चुप मेरी भी चुप असून येथील भोजनालयाचा सावळा गोंधळ संगणमताने होत असल्याची बाब वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी करुन दोशींवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील गृहपाल यांची चांगलेच हितसबंध वरीष्ठ अधिकाऱ्यांसह समाज कल्याण आयुक्तांशी असल्याने त्यांचेवर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचेही बोलले जात आहे. परंतू याचा नाहक त्रास वसतीगृहातील गरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थीनींना भोगावा लागत आहे. परंतू प्रशासनाने वसतीगृहातील समस्यांना गंभिरतेने घेऊन तातडने निकाली काढणे आवश्यक आहे. मात्र आता जिल्हा समाज कल्याण विभाग यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

*वसतिगृहात वॉर्डनसह कर्मचाज्यांचे गैरवर्तन
नुकतेच अमरावती जेलरोड येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या युनिट क्र. 4 वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वसतिगृहातील वॉर्डन व कर्मचऱ्यांची तक्रार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. या निवेदनात वसतिगृहातील गृहपाल श्रीमती आर.के.मेश्राम, कर्मचारी रोहिणी गाडे, सुरक्षा रक्षक करुणा भोवते व इतर कर्मचारी विद्यार्थिनींना या ना त्या कारणावरुन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या तक्रारी विद्यार्थीनींनी वरीष्टांकडे केल्या आहेत.

◆जाचक अटींमुळे विद्यार्थीनी मानसिक तणावाखाली◆

वसतीगृहातील कर्मचाज्यांच्या जाचक अटींमुळे विद्यार्थीनींचे अभ्यासातून लक्ष विचलित होत असल्याने विद्यार्थीनी प्रचंड मानसिक तणावाखाली राहत असून अनेकदा तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता समाज कल्याण आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थीनींकडून होत आहे.

●अनियमित मासीक पाळीच्या तारखेवरुन मुलींच्या चारीत्र्यावर संशय●
वसतीगृहातील गृहपाल, सुरक्षा रक्षक व कर्मचारी अनियमित मासीक पाळीच्या तारखेवरुन मुलींच्या चारीत्र्यावर संशय घेऊन असभ्य भाषेत लज्जा निर्माण होईल अशा शब्दात सर्वांसमोर दमदाटी करीत असल्याचे विद्यार्थीनीं तक्रारी केल्या आहेत. शिवाय विद्यार्थीनींची प्रकृती खराब झाल्यास दवाखाण्यात नेण्यात येत नाही, रात्री चे वेळी सुद्या एकटेच पाठविले जाते. ही अत्यंत गंभिर बाब असून एखादे वेळी अनुचीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!