spot_img

दादासाहेब साकुरे प्रतिष्ठान च्या वतीने ‘डीएमएक्स’चा सन्मान

दादासाहेब साकुरे प्रतिष्ठान च्या वतीने ‘डीएमएक्स’चा सन्मान

■मिररवृत्त
■अमरावती

श्री. दत्त मंदिर संस्थान शिरजगाव कसबा व दादासाहेब उपाख्य हरिभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डीएमएक्स ग्रुप महाराष्ट्रला जीवनसन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.यावेळी डीएमएक्स चे जिल्हाध्यक्ष वृषभ यावले यांनी पुरस्कार स्वीकारत आयोजकांचे आभार व्यक्त केले.
सामाजिक तसेच रक्तदान कार्यात सेवाभावे काम करणाऱ्या डीएमएक्स ग्रुप महाराष्ट्र या संस्थेच्या कार्याची दखल घेत श्री. दत्त मंदिर संस्थान शिरजगाव कसबा व दादासाहेब उपाख्य हरिभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने नुकताच डीएमएक्स चे जिल्हाध्यक्ष वृषभ यावले यांचा सन्मान करण्यात आला.सन्मानपत्र तसेच पाच हजार रुपये रोख यावेळी पुरस्कारापोटी देण्यात आले. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डीएमएक्स ग्रुप चे सर्वत्र अभिनंदन होते आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!