spot_img

माणुसकीने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

माणुसकीने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

■कामगार कल्याण मंडळ आयोजित नाट्य महोत्सव

■मिररवृत्त
■अमरावती

माणसाच्या जीवनात माणुसकीला अनन्य साधारण महत्व असून माणुसकीमुळेच आपला समाजात जिवंत असल्याचे दिसून येते. माणुसकी या महत्त्वपूर्ण विषयावर मेहकरच्या कामगार कल्याण केंद्राने प्राथमिक नाट्य महोत्सवात सादर केलेल्या माणुसकी या नाटकाने प्रेक्षकांच्या आणि परिक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
अमरावती येथील सिपना महाविद्यालयाच्या सभागृहात कामगार कल्याण मंडळाच्या अकोला विभागातर्फे प्राथमिक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवात एकापेक्षा एक सरस नाटक सादर होत आहे. मेहकर येथील कामगार कल्याण केंद्राच्या नाट्यकर्मींनी विनोद सुरूशे लिखित व दुर्गा चौधरी दिग्दर्शित माणुसकी हे नाटक अत्यंत प्रभावी व दमदार अभिनयाच्या सामर्थ्यावर सादर केले. या नाटकात पूजाची भूमिका उषा वर्‍हेकर, सोनूची भूमिका जया दीपक काटरपवार, लहान सोनूची भूमिका किरण संजय बनारसे आणि लहान पूजाची भूमिका जयश्री सावरकर यांनी साकार केली. अतिशय उत्कृष्ट मांडणी, चारही कलाकारांनी केलेला उत्कृष्ट अभिनय, समर्पक संगीत यांच्या बळावर माणुसकीने उपस्थित प्रेक्षकांच्या आणि परिक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!